Hailstorm Forcast Agrowon
हवामान

Unseasonal Rain Update : चिपळूणमध्ये वाऱ्यासह वादळी पाऊस, गारा

चिपळूण तालुक्यातील अलोरे भागात गुरुवारी (ता. १३) दुपारी जोरदार वाऱ्यांसह वादळी पाऊस पडला.

Team Agrowon

Ratnagiri News : चिपळूण तालुक्यातील अलोरे भागात गुरुवारी (ता. १३) दुपारी जोरदार वाऱ्यांसह वादळी पाऊस पडला. त्यामुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. या पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

आलोरेसह पोफळी, कुंभार्ली, शिरगाव, नागावे पेढंबे, कोळकेवाडी परिसरात वादळी पाऊस झाला. चार दिवसांपूर्वीही या परिसरात पाऊस पडला होता.

त्यामुळे आंबा-काजूचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी पुन्हा झालेल्या पावसाने या भागातील बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. अलोरे परिसरात सकाळपासून उकाडा जाणवत होता.

दुपारी अडीचनंतर जोरदार वारे सुरू झाले. त्यामुळे खबरदारी म्हणून महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दुपारी चारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. पाठोपाठ गाराही पडल्या.

त्या गोळा करण्यासाठी ग्रामस्थ घराबाहेर पडले. पण पावसाचा जोर वाढल्याने त्यांची तारांबळ उडाली. पंधरा ते वीस मिनिटे पाऊस झाला.

पाऊस थांबल्यानंतरही वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. या पावसामुळे मात्र हवेत गारवा निर्माण झाला.

संगमेश्वर तालुक्यातही सायंकाळी काही काळ विजांचा कडकडाट झाला. त्या प्रमाणात पाऊस पडला नाही. पण खंडित झालेला वीजपुरवठा रात्रीपर्यंत सुरू झाला नव्हता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT