Weather Update  Agrowon
हवामान

Weather Forecast : विदर्भात आजही वादळी पावसाचा इशारा कायम

Rain Update : विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये शनिवारी (ता. १०) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये शनिवारी (ता. १०) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. आज ( ता. १२) विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामनगाव रेल्वे व अन्य काही तालुक्‍यात पाऊस, गारपीट झाली. वर्धा यवतमाळ जिल्ह्यातही गारपीट व पाऊस झाल्याची नोंद आहे. दरम्यान, सोलापूर येथे रविवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुणे, सांगली व परभणी येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे.

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.४ अंश तापमानाची नोंद झाल्याने थंडी कायम आहे. तर उर्वरित राज्यात किमान तापमान १० ते २३ अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. १२) तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.८ (११.६), धुळे ३०.० (१०.२), जळगाव ३२.२ (१३.०), कोल्हापूर ३४.१ (१८.५), महाबळेश्वर ३०.३ (१६.६), मालेगाव २९.६ (१५.४), नाशिक ३२.८ (१२.०), निफाड ३२.२ (८.४), सांगली ३५.५ (१७.७), सातारा ३४.७ (१४.७), सोलापूर ३६.४(२२.२), सांताक्रूझ ३१.५ (१६.७), डहाणू २८.८ (१८.४), रत्नागिरी ३४.४ (१७.१),

छत्रपती संभाजीनगर ३३.५ (१४.६), नांदेड ३२.६ (२०.८), परभणी ३५.१ (१८.५), अकोला ३३.३ (२०.३), अमरावती ३२.० (१८.९), बुलडाणा ३२.८ (१७.०), ब्रह्मपुरी ३३.२ (१९.०), चंद्रपूर ३१.० (१६.४), गडचिरोली ३०.२ (१७.३), गोंदिया २९.० (१८.६), नागपूर २९.०(१८.६), वर्धा ३०.०(१९.२), वाशीम ३२.८ (१६.६), यवतमाळ ३२.५ (१९.०).

कर्नाटकपासून मराठवाडा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा

उत्तर भारतात थंडीमध्ये चढ-उतार होत आहे. रविवारी (ता. ११) पंजाब मधील अमृतसर यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून मराठवाडा ते विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे शनिवारी (ता. १०) विदर्भात पाऊस आणि गारपीट झाली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price: कोल्हापुरात ऊसदराची कोंडी कायम; साखर कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष

Farmer Compensation Delay: केवायसी पूर्ण नसल्याने शेतकऱ्यांचा पीक नुकसान मदतनिधी रखडला

Soil Testing: माती परीक्षणातून खतांचा संतुलित वापर करा; पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Ujani AI Data Center: उजनीतील ‘एआय डेटा सेंटर’ला विरोध

Financial Assistance for Farmers: शेतकरी, शेतमजुरांना स्वतंत्र आर्थिक साह्य द्या; खासदार भगरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT