Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भ, मराठवाडा, खानदेशात विजांसह पावसाचा इशारा

IMD Alert : आज (ता. १४) पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Team Agrowon

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्र, दक्षिणेकडे कायम असलेला मॉन्सूनचा आस यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १४) पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, टिकमघर, दाल्टोनगंज, दिघा ते पश्चिम - मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. आग्नेय मध्य प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राज्यात पावसाच्या उघडीपीने उन्हाचा चटका वाढला आहे. ढगाळ हवामानासह उकाड्यामुळे घामटा निघत आहे. पुन्हा पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. १४) पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा, खानदेशात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेय

वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली आणखी आज (ता. १४) आणखी तीव्र होण्याचे संकेत असून, शनिवारपर्यंत (ता. १६) ओडिशा आणि छत्तीसगडकडे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Survey : २३ हजार गावांमध्ये नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

PM Dhan Dhaanya Krishi Yojana: सर्वोत्कृष्ट १० जिल्ह्यांत छत्रपती संभाजीनगर

Goat Pregnancy Diagnosis: शेळी, मेंढीमधील गर्भनिदान

Tick Infestation Management: गोठ्यातील गोचीड प्रादुर्भावाचे नियंत्रण

Uzzi Fly Management: उझी माशी व्यवस्थापनासाठी निसोलीनक्स थायमसचा वापर

SCROLL FOR NEXT