Weather Update  Agrowon
हवामान

Rain Forecast : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

Weather Update : राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आज (ता. १०) विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये थंडीची लाट कायम असून, शुक्रवारी (ता. ९) राजस्थानातील सिकार यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार झारखंडमध्ये किमान तापमान ५ ते १० अंशांच्या दरम्यान आहे. उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. १०) विदर्भासह मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यातच शुक्रवारी (ता. ९) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

सांगली येथे पारा ३५ अंशांच्या वर आहे. किमान तापमानाचा पारा १० ते २० अंशांच्या दरम्यान आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे. आज (ता. १०) तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.६ (१३.६), धुळे २९.० (९.४), जळगाव ३२.९ (१३.८), कोल्हापूर ३४.० (१९.६), महाबळेश्वर २९.१ (१७.०), मालेगाव २९.२ (१६.६), नाशिक ३०.९ (१३.९), निफाड ३१.० (१०.२), सांगली ३५.१ (१८.१), सातारा ३४.२ (१५.१), सोलापूर ३७.०(१९.२), सांताक्रूझ ३३.१ (१९.२), डहाणू २८.६ (१८.२), रत्नागिरी ३५.० (१७.६),

छत्रपती संभाजीनगर ३१.४ (१४.४), नांदेड ३०.८ (१८.४), परभणी ३०.४ (१४.८), अकोला ३०.३ (१४.५), अमरावती २९.८ (१४.०), बुलढाणा २८.० (१४.५), ब्रह्मपूरी ३०.० (१४.०), चंद्रपूर ३३.२ (१३.६), गडचिरोली २९.६ (१३.४), गोंदिया २७.२ (१२.२), नागपूर २८.६(१४.८), वर्धा २९.०(१३.५), वाशीम ३४.६ (१२.८), यवतमाळ ३०.७ (१५.५).

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मराठवाडा : जालना, परभणी, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price: कोल्हापुरात ऊसदराची कोंडी कायम; साखर कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष

Farmer Compensation Delay: केवायसी पूर्ण नसल्याने शेतकऱ्यांचा पीक नुकसान मदतनिधी रखडला

Soil Testing: माती परीक्षणातून खतांचा संतुलित वापर करा; पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Ujani AI Data Center: उजनीतील ‘एआय डेटा सेंटर’ला विरोध

Financial Assistance for Farmers: शेतकरी, शेतमजुरांना स्वतंत्र आर्थिक साह्य द्या; खासदार भगरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT