Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात वादळी पावसाचा इशारा

Weather News : राज्यात उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली असतानाच विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली असतानाच विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा आहे. पूर्व विदर्भात गारपिटीसह वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची रेलचेल वाढू लागली आहे. राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होत आहे. उन्हाचा चटका कमी होऊ लागला असून, वाशीम, गोंदिया जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव आणि वाशीम येथे ४२.६ अंश तापमान नोंदले गेले.

तर अकोला व जळगाव येथे ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका कायम असला तरी कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. उकाड्यामुळे घामटा निघत असून, उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून दक्षिण अंतर्गत कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वायव्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून पश्‍चिम विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे.

राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३९.४, धुळे ४१, जळगाव ४२.४, कोल्हापूर ३७.१, महाबळेश्‍वर ३२.६, मालेगाव ४२.६, नाशिक ३९.२, निफाड ३८.९, सांगली ३८, सातारा ३९.२, सोलापूर ४१.६, सांताक्रूझ ३३.६, डहाणू ३४.९, रत्नागिरी ३४,

छत्रपती संभाजीनगर ४०.२, बीड ४०.७, नांदेड ४०.६, परभणी ४१.३, अकोला ४२.५, अमरावती ४०.६, बुलडाणा ४०.४, ब्रह्मपुरी ४०.१, चंद्रपूर ३९, गडचिरोली ३९.४, गोंदिया ३६, नागपूर ३९.१, वर्धा ४१, वाशीम ४२.६, यवतमाळ ४०.५.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) :

भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

मालेगाव ४२.६, वाशीम ४२.६, अकोला ४२.५, जळगाव ४२.४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Account Verification: शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीसाठी तपासणी

Monsoon In Kerala: आनंदघन केरळात

Onion Procurement Rules: कांदा खरेदीचे निकष शिथिल

Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT