Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Weather News : राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर उन्हाचा चटका कमी-अधिक होत असला, तरी उकाडा कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर उन्हाचा चटका कमी-अधिक होत असला, तरी उकाडा कायम आहे. आज (ता. १८) विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४० अंशांच्या वर आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत.

आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. रायलसीमा आणि उत्तर तमिळनाडूमध्ये समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटरपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३६.८, धुळे ४१, जळगाव ४२.८ कोल्हापूर ३६.८, महाबळेश्‍वर २८.१, मालेगाव ३९.२, नाशिक ३८.१, निफाड ३७.६, सांगली ३७.५, सातारा ३७.७, सोलापूर ३८.६, सांताक्रूझ ३५.७, डहाणू ३६.८, रत्नागिरी ३४.५,

छत्रपती संभाजीनगर ३९.९, बीड ३८.२, नांदेड ३८.६, धाराशिव ३७, परभणी ३८.१, अकोला ४२.४, अमरावती ४०.८, बुलडाणा ३८, ब्रह्मपुरी ४१.२, चंद्रपूर ३७.८, गडचिरोली ३५, गोंदिया ३८.८, नागपूर ३८.८, वर्धा ४०, वाशीम ४१.२, यवतमाळ ४०.

मॉन्सून दोन दिवसांत अंदमानात

नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनास पोषक हवामान झाले आहे. उद्यापर्यंत (ता. १९) दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागर आणि निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यातच देवभूमी केरळमध्ये येत्या ३१ रोजी मॉन्सून दाखल होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT