Rain Update  Agrowon
हवामान

Rain Forecast : पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Weather Update : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असल्याने पहाटे गारठा तर दुपारी चटका अशीच स्थिती अनुभवायला मिळत आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असल्याने पहाटे गारठा तर दुपारी चटका अशीच स्थिती अनुभवायला मिळत आहे. यातच आता पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (ता. १६) पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्याच्या कमाल, किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहणार आहे.

उत्तर ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून पूर्व विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर मराठवाड्यापासून कर्नाटक, तामिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाचा पोषक हवामान असून, आज (ता. १६) पूर विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत यवतमाळ येथे राज्यातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर, ब्रह्मपूरी येथेही पारा ३९ अंशांपार स्थिरावला आहे. तापमानात चढ-उतार होत असून, किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काळात उन्हाची ताप आणखी वाढत जाणार आहे.

शुक्रवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.१ (१४.१), धुळे ३५.० (१२.०), जळगाव ३६.० (१६.४), कोल्हापूर ३५.८ (२०.६), महाबळेश्वर ३०.२ (१६.५), मालेगाव ३७.८ (-), नाशिक ३३.३ (१४.२), निफाड ३३.५ (९.४), सांगली ३७.० (२१.१), सातारा ३६.८ (१८.२), सोलापूर ३९.४ (२१.२), सांताक्रूझ ३१.५ (२०.४), डहाणू ३०.६ (१८.९), रत्नागिरी ३१.० (१९.१),

छत्रपती संभाजीनगर ३५.६ (१८.६), नांदेड ३६.४ (२०.४), परभणी ३७.१ (२०.३), अकोला ३७.९ (१८.३), अमरावती ३६.४ (१७.७), बुलढाणा ३५.० (१९.६), ब्रह्मपूरी ३९.० (१९.६) चंद्रपूर ३८.४ (१८.८), गडचिरोली ३६.६ (२०.०), गोंदिया ३६.५ (१७.६), नागपूर ३६.८ (१८.२), वर्धा ३७.६ (२०.०), वाशीम ३८.६ (१७.४), यवतमाळ ३९.५ (१७.२).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Survey: दुष्काळी पंचनामे आजपासून; मुख्यमंत्री फडणवीस

Karnataka Drought Crisis: दुष्काळप्रश्‍नी कर्नाटकचे विशेष अधिवेशन

Jaljeevan Mission 2.0: ‘जलजीवन मिशन २.०’साठी मनुष्यबळ द्या : केंद्राचे निर्देश

Heavy Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात वाढणार पावसाचा जोर

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

SCROLL FOR NEXT