Weather agrowon
हवामान

Weather Update : मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात वादळी पावसाचा इशारा

राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. अंशतः ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम आहे.

Team Agrowon

Monsoon Update : पुणे : राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. अंशतः ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम आहे.

आज (ता. ३१) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भात अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमान ४२ अंशांच्या वर आहे.

उर्वरित राज्यात तापमान ३४ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार होत असले, तरी उष्ण व दमट हवामानामुळे उन्हाच्या झळा आणि उकाडा टिकून आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे.

नैॡत्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्व मध्य प्रदेशात चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून पूर्व बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. दक्षिण अंदमान समुद्रात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर, तसेच अरबी समुद्रात केरळजवळ १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती तयार झाल्या आहेत.

यातच पश्‍चिम विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने आज (ता. ३१) दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह, पावसाची शक्यता आहे.


मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३९.१ (२१.९), जळगाव ४१.७ (२४.८), धुळे ४१ (२१.६), कोल्हापूर ३८ (२५.९), महाबळेश्‍वर ३४.६ (१५.८), नाशिक ३८.४ (२३),

निफाड ३९.८ (२४.९), सांगली ४०.२ (२५.४), सातारा ३८.६ (२२.४), सोलापूर ४२.२ (२६.४), सांताक्रूझ ३४.४ (२७.६), डहाणू ३४.५ (२७.३), रत्नागिरी ३४.३ (२६.५), छत्रपती संभाजीनगर ४०.६ (२४.६), नांदेड ४१.२ (२६), परभणी ४२.५ (२८.४), अकोला ४२.७ (२८.८),

अमरावती ४२.६ (२५.७), बुलडाणा ३९.५ (२६.८), ब्रह्मपुरी ४१.१ (२६.४), चंद्रपूर ४१.८ (२१.६), गोंदिया ४१ (२७.६), नागपूर ३९ (२५), वर्धा ४२ (२७.२), वाशीम ४२.२ (२५) यवतमाळ ४०.७ (२३).

वादळी पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र : सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर.


मराठवाडा : नांदेड, लातूर, धाराशिव
विदर्भ : वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :
अकोला ४२.७, अमरावती ४२.६, परभणी ४२.५, सोलापूर ४२.२, वाशीम ४२.२, वर्धा ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT