Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune Weather News : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असून, उकाडा वाढत आहे. गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी १४ अंशांच्या पुढे कायम आहे.

रायलसिमापासून, दक्षिण छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाह देखील खंडित झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे.

आज (ता. २४) मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर येथे, तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :


पुणे ३१.१ (१६.३), जळगाव ३४.० (१९.०), धुळे ३३.० (१४.०), कोल्हापूर ३४.३ (१९.०), महाबळेश्वर २७.३ (१३.८), नाशिक ३०.५ (१७.०), निफाड ३१.५(१३.६), सांगली ३३.४ (१८.७), सातारा ३३.० (१६.६), सोलापूर ३५.२(२०.०), सांताक्रूझ ३१.६ (२२.८), डहाणू ३१.३ (२१.८), रत्नागिरी ३२.५

(२२.४), छत्रपती संभाजीनगर ३१.६ (१८.७), नांदेड ३४.४ (२०.०), परभणी ३३.६ (१९.८), अकोला ३४.९ (१९.०), अमरावती ३४.४(१८.१), बुलडाणा ३२.० (१९.६), ब्रह्मपुरी ३४.६ (२०.१), चंद्रपूर

३६.० (२१.२), गडचिरोली ३०.०(१८.२), गोंदिया ३२.० (१९.०), नागपूर ३२.२ (१९.०), वर्धा ३३.८(१९.०), वाशीम ३२.८ (१८.०), यवतमाळ ३३.२ (२०.०).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर.
मराठवाडा : परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT