Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Weather News : राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर ओसरला आहे. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी-अधिक होत असतानाच, उकाडा मात्र कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर ओसरला आहे. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी-अधिक होत असतानाच, उकाडा मात्र कायम आहे. आज (ता. १९) विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात येमेनच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटरपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत (ता. २२) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असून, त्याची तीव्रता वाढणार आहे.

शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे आणि जळगाव येथे उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात काही ठिकाणी पारा ४० अंशांच्या वर आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या.

ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. आज (ता. १९) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर विदर्भासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३६.६, धुळे ४२, जळगाव ४२, कोल्हापूर ३५.६, महाबळेश्‍वर २८.६, मालेगाव ४०.२, नाशिक ३८.२, निफाड ३८.३, सांगली ३५.४, सातारा ३६.९, सोलापूर ३७.६, सांताक्रूझ ३६, डहाणू ३७, रत्नागिरी ३४.४, छत्रपती संभाजीनगर ३८, बीड ३७.५, परभणी ३४.३, अकोला ४०.२, अमरावती ३७, बुलडाणा ३७.६, ब्रह्मपुरी ३७.२, चंद्रपूर ३६, गडचिरोली ३५, गोंदिया ३२.४, नागपूर ३४.१, वर्धा ३७.४, वाशीम ३९.२, यवतमाळ ४०.

मॉन्सून आज अंदमानात

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनास पोषक हवामान झाले आहे. बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी होऊ लागली आहे. आज (ता. १९) दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागर आणि निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यातच देवभूमी केरळमध्ये ३१ रोजी मॉन्सून दाखल होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT