Weather Agrowon
हवामान

Rain Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

Rain Prediction : कोकणासह, घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरल्यानंतर राज्यातही पावसाची काहीशी उघडीप आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : कोकणासह, घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरल्यानंतर राज्यातही पावसाची काहीशी उघडीप आहे. आज (ता. १२) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पश्‍चिम भाग दक्षिणेकडे कायम असून, पूर्व भाग काहीसा उत्तरेकडे आहे.

मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेर, सिकार, ओराई, सुलतानपूर, पाटना, मालदा ते अरुणाचल प्रदेशापर्यंत सक्रिय आहे. पश्‍चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून केरळ किनारपट्टीपर्यंत कायम आहे. उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

कोकण, घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला आहे. विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. आज (ता. ११) तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, उर्वरित कोकणात जोर काहीसा ओसरून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन दिवस मुख्यतः पावसाची उघडीप राहणार आहे. विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. गुरुवारपासून (ता. १३) कोकण, घाटमाथ्यावर पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : धुळे, जळगाव, नाशिक.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड.

विदर्भ ः बुलडाणा, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली.

मंगळवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

कोकण :

अंबरनाथ ९०, म्हसळा, कणकवली, कर्जत, विक्रमगड प्रत्येकी २०.

मध्य महाराष्ट्र :

नवापूर ६०, अक्कलकुवा, पेठ प्रत्येकी ४०, जळगाव, तळोदा, इगतपुरी, राधानगरी प्रत्येकी ३०, नंदूरबार, गगनबावडा, धरणगाव, ओझरखेडा, सुरगाणा, चोपडा, महाबळेश्‍वर, धुळे, त्र्यंबकेश्‍वर प्रत्येकी २०.

मराठवाडा ः

किनवट, बिलोली प्रत्येकी २०.

विदर्भ :

मुलचेरा ८०, भंडारा, ६०, जेवती, सिरोंचा, ब्रह्मपुरी, चिमूर प्रत्येकी ५०, साकोली, सिंदेवाही, नागभिड, भामरागड प्रत्येकी ४०, पवनी, चामोर्शी, कोर्पणा, चंद्रपूर, धानोरा, लाखणी, अरमोरी, गडचिरोली, प्रत्येकी ३०.

घाटमाथा :

दावडी ५०, शिरगाव, आंबोणे, डुंगरवाडी, ताम्हिणी प्रत्येकी ३०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dry Fruit Imports India : ट्रम्प यांनी इराणाला दिलेल्या इशाऱ्यानंतर भारतीय सुका मेवा व्यापाऱ्यांची चिंता वाढली; आयात ठप्प होण्याची भीती

Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात भाजपची जोरदार मुसंडी, जाणून घ्या महापालिकानिहाय निकाल

Nano Fertilizers: शाश्वत शेतीसाठी नॅनो खतांचा वापर गरजेचा

Kidney Sale: किडनी घेता का कुणी किडनी..?

Local Dody Elections: सांगलीत किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत

SCROLL FOR NEXT