IMD Rain Prediction Agrowon
हवामान

IMD Rain Predication : चिंता वाढणार: राज्यात ऑगस्टमध्ये कमी पाऊस; मराठवाडा, विदर्भात खंड पडणार ?

Monsoon Rain Forecast : ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.

अनिल जाधव

Pune News : ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. कोकण आणि खानदेशातील काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात पाऊस कमी राहील, तर तिसऱ्या आठवड्यापासून पाऊस सुरु होऊन चौथ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी आज (ता.३१) माॅन्सून हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज दिला. माॅन्सूच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

दोन्ही महिन्यांत सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांत सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ऑगस्टमध्ये कमी पाऊस

ऑगस्ट महिन्यात देशात हवामान विभागाने सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज दिला. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

विदर्भात कमी पावसाची शक्यता

ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी राहणार आहे. मराठवाड्यातही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी राहणार आहे. अहिल्यानगर, नाशिक, ठाणे, पालघर, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात मात्र सरासरी आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri College Land Issue: कृषी महाविद्यालयातील आठ एकर जमीन नापीक

Hingoli Turmeric Market: हिंगोली बाजार समितीत हळदीची ३ लाख १९ हजार क्विंटल आवक

Fuel and Fertilizer Prices: इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार

Cotton Procurement Policy: कापूस खरेदीऐवजी भावांतर राबविणार

Maharashtra Heat Update: राज्यात उष्णतेची लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT