Agriculture College Land Management: कृषी महाविद्यालय (पुणे) येथील सुमारे आठ एकर सुपीक जमीन प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे नापीक झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या जमिनीत मोठ्या दगडांसह मातीमिश्रित राडारोडा टाकला जात असून, संबंधित ठिकाणे आता राडारोडा टाकण्याचे केंद्र बनल्याचे दिसून येत आहे..सभागृह उभारणीच्या नावाखाली महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीमागील नर्सरी हटवून खड्डा करण्यात आला. त्यानंतर योग्य माती टाकण्याऐवजी मोठ्या दगडांसह राडारोडा टाकण्यात आला. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून या ठिकाणी एकदाही पीक घेण्यात आलेले नाही. तसेच मुख्य जुन्या इमारतीच्या पाठीमागे, कृषी विद्या विभागाजवळील ओढ्यालगतच्या सुमारे पाच ते सहा एकर जमिनीत सिमेंट, लोखंड व दगडमिश्रित राडारोडा टाकण्यात आला आहे. परिणामी, संशोधनासाठी आवश्यक प्रयोग घेणे अशक्य झाले आहे..Land Measurement: मापदंड मोजणीचे.दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीपासून व्हीआयपी गेस्ट हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा डंपरद्वारे राडारोडा टाकण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, हे डंपर रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कामासाठी कोणाची परवानगी आहे, तसेच खाजगी बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासन यांच्यात आर्थिक साटेलोटे झाले आहेत का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे..विद्यार्थी, प्राध्यापक वर्गाकडूनही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त होत असून, राडारोडा टाकण्यास परवानगी कोणी दिली, त्यासाठी कोणती प्रक्रिया राबविण्यात आली, तसेच सुपीक शेतजमिनीबाबत असा निर्णय का घेण्यात आला, याबाबत चौकशीची मागणी होत आहे..Nagpur Agriculture College: नागपूर कृषी महाविद्यालयाच्या इमारतीला नूतनीकरणाची प्रतीक्षा.याबाबत सहयोगी अधिष्ठाता महानंद माने यांनी सांगितले की, शताब्दी इमारत व मुख्य इमारतीमागील जागेत राडारोडा टाकण्याचा निर्णय हा कृषी विद्या विभागातील प्राध्यापकांच्या निर्णयानुसार घेण्यात आला आहे. तसेच व्हीआयपी गेस्ट हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पादचारी मार्ग (ट्रेक) तयार करण्यासाठी माती टाकण्यात येत आहे. दुसरे म्हणजे, साखर संकुलातील सहकार भवनाच्या बांधकामातील राडारोडा टाकण्यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, विद्यापीठाने नियमानुसार जागेचे भाडे घेतले आहे..कुलगुरू, कृषिमंत्री अनभिज्ञ?देशात नावाजलेल्या पुणे कृषी महाविद्यालयात मागील आठ ते दहा महिन्यांत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे तसेच अलीकडेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारलेले डॉ. विलास खर्चे यांनी अनेक वेळा भेटी दिल्या. या भेटींमध्ये महाविद्यालयातील विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. मात्र महाविद्यालयातील राडारोड्याविषयी कोणतीही माहिती घेतली गेली नसल्याचे समोर येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.