Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात ४ दिवस पावसाची उघडीप राहणार; बुधवारी राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Rain Update : उत्तर ओडिशात ठळक दाब क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढील १२ तासात हे कमी दाब क्षेत्र विरण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News : उत्तर ओडिशात ठळक दाब क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढील १२ तासात हे कमी दाब क्षेत्र विरण्याची शक्यता आहे. तर राज्यात पुढील ४ दिवस बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील बहुतांशी ठिकाणी कालपासून पावसाची उघडीप आहे. तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून काही भागात सकाळी हवेत गारवाही जाणवत आहे.

हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहील असा अंदाज दिला. तर सोमवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

मंगळवारीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तर बुधवारी विदर्भातील यवतमाळ, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Officer: शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याच्या निलंबनाची शिफारस

Nira Bhatghar Dam: मुबलक पाण्यामुळे भोरमधील शेती बहरणार

Ujani Dam: सांडपाण्यामुळे कोंडला ‘उजनी’चा श्वास!

Soybean MSP: सोयाबीन गाठणार हमीभावाचा टप्पा

Pulses Market: तूर, हरभरा बाजारात तेजीचा सूर

SCROLL FOR NEXT