Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Weather Forecast : पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
Maharashtra Rain
Maharashtra Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : दक्षिण भारतात ईशान्य माॅन्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे दक्षिणेतली चार राज्यांमध्ये चांगला पाऊस हजेरी लावत आहे. महाराष्ट्रातही काही भागात मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. तर पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Maharashtra Rain
Monsoon : देशातून मॉन्सून परतला...

हवामान विभागाने आज कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मध्य महाराष्ट्रही खानदेश वगळता सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच खानदेशातील तिन्हे जिल्हे आणि मराठवाड्यातील बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Maharashtra Rain
Pune Rain : पुणे जिल्ह्यात पावसाची उघडझाप

उद्या राज्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सर्व जिल्हे, मध्य महराष्ट्रातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

शनिवारी कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आला. रविवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com