High Temperature Agrowon
हवामान

High Temperature : सूर्य कोपला, जमीन होरपळली

Weather News : हरियानातील सिरसा येथे देशातील उच्चांकी ४७.८ अंश. जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ४५.२ अंश तापमान. मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा.

Team Agrowon

Pune News : सूर्याच्या तप्त लहरी जमिनीकडे झेपावत असल्याने वैशाख वणवा भडकला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने जमीन अक्षरशः होरपळून निघत आहे. यातच राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस कोसळत आहे. आज (ता. २३) मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा, तर राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये हरियानातील सिरसा येथे देशाचे हंगामातील उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर जळगाव येथे राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने उष्णतेची लाट आली आहे.

तर धुळे येथे ४४.५ आणि अकोला येथे ४४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. असह्य उकाड्याने घामाच्या धारा वाहत आहेत. आज (ता. २३) मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

वायव्य राजस्थान आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांपासून मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र ते उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण केरळ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. सकाळपासून असलेल्या तापदायक उन्हानंतर दुपारी काळ्याकुट्ट ढगांची दाटी होत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पूर्वमोसमीच्या सरी दिलासा देत आहे. आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.

बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ४०.६, धुळे ४४.५, जळगाव ४५.२, कोल्हापूर ३६.२, महाबळेश्‍वर ३०.९, नाशिक ४१.८, निफाड ४२, सांगली ३६.४, सातारा ३८.४, सोलापूर ४१.८, सांताक्रूझ ३४.९, डहाणू ३६.७, रत्नागिरी ३२.८, छत्रपती संभाजीनगर ४१.६, नांदेड ४०.८, धाराशिव ४०.५, परभणी ४१.७, अकोला ४४, अमरावती ४३.२, भंडारा ४०.१, बुलडाणा ४१.३, ब्रह्मपुरी ४३.३, चंद्रपूर ४२.८, गडचिरोली ४१.४, गोंदिया ३९.६, नागपूर ४०.७, वर्धा ४३.१, वाशीम ३९.२, यवतमाळ ४२.

उष्ण लाटेचा इशारा. (येलो अलर्ट) :
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अकोला.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ.

४३ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे : जळगाव ४५.२, धुळे ४४.५, अकोला ४४, ब्रह्मपुरी ४३.३, अमरावती ४३.२, वर्धा ४३.१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT