Team Agrowon
गेल्या दोन दिवसांत झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः धूळधाण झाली आहे.
वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.
वादळी वारे आणि पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी तर गारांचा खच पडल्याचे चित्र होते.
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याच्या कष्टाची अक्षरशः माती झाली आहे.
मराठवाडा, विदर्भासह राज्यातील नाशिक, नगर, बीडमध्येही गारपिटीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
उन्हाळ कांदा, गहू, हरभरा यासह डाळिंब, आंबा, द्राक्षाच्या फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.