Summer Heat Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात तापमानाचा पारा ४० अंशाकडे

Summer Heat : सुर्य आग ओकायला लागल्याने उन्हाच्या झळा तापदायक ठरू लागल्या आहेत.

अमोल कुटे

Pune News : सुर्य आग ओकायला लागल्याने उन्हाच्या झळा तापदायक ठरू लागल्या आहेत. तापमानाचा पारा चाळीशीकडे वाटचाल करत असून, काही ठिकाणी कमाल तापमान ३९ अंशांच्या पार गेले आहे. मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २४) राज्यात उन्हाची ताप, उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विदर्भापासून उत्तर केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात आकाश स्वच्छ होत असून, सुर्यप्रकाश थेट जमीनीवर आल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ अकोला, वाशीम, यवतमाळ आणि जळगाव येथे तापमान ३९ अंशांच्या पुढे गेले आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरू लागले आहे. राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३७.५, नगर ३५.९, धुळे ३८.०, जळगाव ३९.०, कोल्हापूर ३५.७, महाबळेश्वर ३१.३, नाशिक ३६.९, निफाड ३६.०, सांगली ३६.८, सातारा ३७.०, सोलापूर ३८.६, सांताक्रूझ ३५.४, डहाणू ३३.४, रत्नागिरी ३२.५,

छत्रपती संभाजीनगर ३७.६, नांदेड ३७.८, परभणी ३८.८, अकोला ३९.८, अमरावती ३८.६, बुलढाणा ३७.६, ब्रह्मपूरी ३८.२, चंद्रपूर ३८.६, गडचिरोली ३५.२, गोंदिया ३५.०, नागपूर ३७.३, वर्धा ३८.१, वाशीम ३९.६, यवतमाळ ३९.५.

३९ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

मालेगाव ४०.८, अकोला ३९.८, वाशीम ३९.६, यवतमाळ ३९.५, जळगाव ३९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT