Summer Heat Agrowon
हवामान

Summer Heat : तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीपार

Maharashtra Temperature : राज्यात वादळी पावसाने बहुतांश भागात उघडीप दिल्याने उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. जळगाव, धुळे, अकोला येथे तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीपार गेला आहे.

Team Agrowon

Pune Weather Update : राज्यात वादळी पावसाने बहुतांश भागात उघडीप दिल्याने उन्हाचा चटका (Heat) पुन्हा वाढला आहे. जळगाव, धुळे, अकोला येथे तापमानाचा (Temprature) पारा पुन्हा चाळिशीपार गेला आहे.

आज (ता. ९) दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर धुळे आणि अकोला येथे ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. किमान तापमानातही वाढ कायम असून, उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाड्यातील वाढ कायम आहे.

उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर, तसेच ईशान्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवरील चक्राकार वाऱ्याची स्थिती कमी दाब क्षेत्रामध्ये मिसळून गेली आहे.

ईशान्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. आज (ता. ९) दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाची शक्यता आहे.

सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.८ (२४.२), जळगाव ४१.० (२६.५), धुळे ४०.० (-), कोल्हापूर ३५.१ (२४.१), महाबळेश्वर २६.१ (१८.०), नाशिक ३४.५ (२२.८),

निफाड ३६.६ (२४.०), सांगली ३७.४ (२३.२), सातारा ३५.९ (२२.८), सोलापूर ३८.० (२२.९), सांताक्रूझ ३२.९ (२७.६), डहाणू ३२.९ (२६.७), रत्नागिरी ३३.४ (२८.०),

छत्रपती संभाजीनगर ३४.६ (२४.४), नांदेड ३७.४ (२५.०), परभणी ३६.७ (२६.०), अकोला ४०.० (२६.४), अमरावती ३८.८(२२.६), बुलडाणा ३६.६ (२६.०), ब्रह्मपुरी ३८.० (२३.०),

गडचिरोली ३८.०(२३.६), गोंदिया ३८.० (२४.०), नागपूर ३८.९ (२४.१), वर्धा ३९.०(२६.४), वाशीम ३५.४ (२४.०), यवतमाळ ३७.५ (२५.७).

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र, : सातारा, सांगली, कोल्हापूर.

उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती

आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात सोमवारी (ता. ८) कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, उद्यापर्यंत (ता. १०) अंदमान बेटांजवळ चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. ही वादळी प्रणाली उत्तरेकडे सरकून बांगलादेश, म्यानमारच्या किनाऱ्याकडे जाण्याची शक्यता आहे.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

जळगाव ४१, धुळे ४०, अकोला ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT