Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : तापमानातील वाढ कायम राहणार

High Temprature : फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा

Team Agrowon

Weather News : पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने उघडीप दिली असली तरी राज्यात ढगाळ हवामान, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा अनुभवायला मिळत आहेत. आज (ता. १५) राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात ढगाळ हवामान अनुभवायला मिळत असतानाच, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. बुधवारी (ता. १४) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३३ अंशांच्या वरच आहे. निफाड येथे किमान तापमान ८.५ अंशांवर असून, उर्वरित राज्यात मात्र तापमान ११ अंशांच्या पुढे गेले आहे. आज (ता. १४) ढगाळ हवामान आणि तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३३.८ (१३.९), धुळे ३२.० (११.८), जळगाव ३३.६ (१४.२), कोल्हापूर ३३.४ (१८.६), महाबळेश्वर २८.५ (१६.०), मालेगाव ३३.२ (१६.०), नाशिक ३२.३ (१४.२), निफाड ३१.० (८.६), सांगली ३४.४ (१८.०), सातारा - (१४.४), सोलापूर ३६.२ (२०.६), सांताक्रूझ ३२.२ (१८.४), डहाणू ३०.० (२०.५), रत्नागिरी ३४.२ (१७.०), छत्रपती संभाजीनगर ३२.० (१५.६), नांदेड ३४.६ (१९.४), परभणी ३५.२ (१८.६), अकोला ३२.९ (१७.०), अमरावती ३२.२ (१७.१), बुलडाणा ३२.० (१६.०), ब्रह्मपुरी ३३.० (१८.०), चंद्रपूर ३२.२ (१७.४), गडचिरोली ३०.६ (१७.०), गोंदिया २९.६ (१७.८), नागपूर ३०.६(१७.८), वर्धा ३२.९(१८.४), वाशीम ३३.६ (१६.२), यवतमाळ ३३.७ (१८.२).


उत्तर भारतातील थंडी कमी
उत्तर भारतात थंडी कमी झाली आहे. पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार व झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. यातच मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT