Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Return : काही भागात आज हलक्या पावसाचा अंदाज; माॅन्सूनचा परतीचा प्रवास आजही थांबलेलाच

Rain Alert : हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे.

Anil Jadhao 

Monsoon back : माॅन्सूनचा परतीचा प्रवास मागील तीन दिवसांपासून थबकलेला आहे. माॅन्सूनची सीमा एकाच भागात कायम आहे. तर राज्यात उन्हाचा चटका असह्य होत आहे. तसेच हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे.

हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये आज हलक्या सरी पडतील, असा अंदाज दिला. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. तसेच तसेच वाऱ्यांचा वेगही जास्त राहण्याचा अंदाज आहे. सोबतच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

माॅन्सूनचा परतीचा प्रवास आजही थबकलेला होता. माॅन्सून महाराष्ट्राच्या बहुतांशी भागातून माॅन्सून परतला. सध्या माॅन्सून कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्याचा काही भाग आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात आहे. माॅन्सूनच्या परतीची सिमा दौलतगंज, कांकेर, रामागुंडम, बिजापूर आणि वेंगुर्ला या भागात कायम होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT