Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon Rain : पावसाचा जोर ओसरला

Rain Alert : राज्यात सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. सोमवारी (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. सोमवारी (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

छत्तीसगड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर, कोटा, दामोह, पेंद्रा रोड, बालासोर ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, महाराष्ट्राच्या उत्तर भागात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे.

कोकण, घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच असल्याने काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. साताऱ्याच्या घाटमाथ्यावरील शिरगाव येथे उच्चांकी १३० मिलिमीटर पाऊस झाला. घाटमाथ्यावर काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या, अनेक ठिकाणी पावसाची उसंत कायम होती.

आज (ता. २९) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा ‘येलो’ अलर्ट आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT