Weather News Agrowon
हवामान

Weather News : किमान तापमान वाढले

Weather Update : बहुतांश ठिकाणी पारा पुन्हा १३ अंशांवर

Team Agrowon

Weather : पुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी होत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पारा पुन्हा १३ अंशांच्या वर गेला आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २९) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,

राजस्थानमध्ये अनेक भागात किमान तापमान ८ ते ११ अंशांच्या दरम्यान होते. उत्तरेकडून महाराष्ट्राकडे येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह काहीसे कमी झाल्यानंतर राज्याच्या किमान तापमानातही वाढ होत आहे.

थंडी कमी होण्याचा अंदाज
राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने पारा पुन्हा ११ अंशांच्या वर गेला आहे. शुक्रवारी (ता. २९) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात तापमानाचा पारा १३ अंशांच्या वरच आहे.

आज (ता. ३०) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. गारठाही कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३०.७ (१३.०), धुळे ३२.० (११.०), जळगाव ३०.० (१३.९), कोल्हापूर ३०.६ (१६.९), महाबळेश्वर २८.८ (१५.३), नाशिक ३०.३ (१४.४), निफाड ३०.५ (१२.५), सांगली ३०.४ (१५.२), सातारा ३१.० (१३.९), सोलापूर ३२.०(१६.२), सांताक्रूझ ३४.९ (२०.२), डहाणू ३२.० (१९.३), रत्नागिरी ३५.६

(१९.२), छत्रपती संभाजीनगर २८.५ (१३.५), नांदेड २९.४ (१६.४), परभणी २९.४ (१६.४), अकोला ३१.३ (१५.६), अमरावती २९.८ (१४.५), बुलडाणा २९.५ (१६.०), ब्रह्मपुरी ३२.० (१४.१), चंद्रपूर २८.८(१४.९), गडचिरोली २९.२ (१३.४), गोंदिया २८.२ (१३.५), नागपूर २८.८(१४.९), वर्धा २९.२(१४.९), वाशीम २९.८ (१४.२), यवतमाळ ३०.० (१७.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

Agriculture Tools Bank: महिला गटांसाठी कृषी अवजारे बँक

Maharashtra Rain Alert: वादळी पावसासह उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT