Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain: उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार; राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Rain Update : राज्याच्या अनेक भागात ठिकठिकाणी कालपासून हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. तर काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. आजही राज्यात काही भागात हलक्या सरी पडल्या आहेत.

Team Agrowon

पुणेः राज्याच्या अनेक भागात ठिकठिकाणी कालपासून हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. तर काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. आजही राज्यात काही भागात हलक्या सरी पडल्या आहेत. पण उद्यापासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

आज राज्याच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम सरी पडल्या. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मात्र अनेक भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. हवामान विभागाने आज खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तसेच मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर कोकणातही ठिकठिकाणी जोरदार सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या म्हणजेच रविवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तसेच खानदेशातील नंदूरबार, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि सातारा तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्याच्या इतर भागात हलक्या सरी पडू शकतील, असा अंदाजही हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Villagers Protest: अदानी प्रकल्पाविरोधात पाटण तालुक्यातील सात गावे आक्रमक

Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’कडून खोडवा उसास १०० रुपये प्रतिटन अनुदान

Farmer Protest: कर्जमुक्ती, वाढीव भरपाईसाठी बुधवारी गावोगावी आंदोलने

Smart Governance: पंचायतराज अभियानासाठी ग्रामसेवकांना लॅपटॉप

Hindustan Aeronautics: बलशाली भारतासाठी हिंदुस्थान एरॉनॉटिक्सची भूमिका महत्त्वाची

SCROLL FOR NEXT