Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार; उद्या विदर्भ आणि खानदेशात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या बहुतांशी भागात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरिप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान विभागाने आजही राज्याच्या बहुतांशी भागात पावसाचा अंदाज दिला. मात्र उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली. 

माॅन्सूनने २३ सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरातमधून माघार घेतली होती. तर २४ नोव्हेंबरलाही आणखी काही भागातून माॅन्सून परतला होता. मात्र २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान माॅन्सून एकाच जागेवर होता. म्हणजेच आजही माॅन्सूनचा प्रवास थबकला होता. 

हवामान विभागाने आज रायगड, पालघर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर कोकणातील रत्नागिरी आणि ठाणे तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला. 

तर उद्या मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच रविवार, सोमवार आणि मंगळवारी राज्यात पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rajaram Sugar Factory : राजाराम साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ, सभागृहात प्रवेश नाकारल्याने सत्ताधाऱ्यांचा निषेध

Rice Export : केंद्राने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली, अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क देखील १० टक्क्यांवर आणले

Agriculture Success Story : भाजीपाला, दुग्धोत्पादनात ओळख सावरगावतळची!

Soybean Disease : सोयाबीन पिकातील ‘टार्गेट स्पॉट रोग’

World Rabies Day : रेबीज नियंत्रणासाठी सर्वसमावेशक उपायांची गरज

SCROLL FOR NEXT