Monsoon Rain  Agrowon
हवामान

Monsoon Return: राज्यात उन्हाचा चटका वाढला; मॉन्सून परतीची सीमा जैसे थे

Monsoon Rain : पुढील पाच दिवस राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.

Dhananjay Sanap

Monsoon Back : राज्यात ऑक्टोबर हिटची चाहूल लागली आहे. राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडयात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. आज राज्यातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. 

आज राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

मंगळवारी मॉन्सूननं उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या आणखी काही भागासह उर्वरित राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं. मॉन्सूनच्या परतीच्या सीमा गुरुवारीही गुलमार्ग, धरमशाला, मुक्तेश्वर, पीलीभीट, ओराई, अशोकनगर, इंदोर, बडोदा, पोरबंदर भागात कायम आहे. 

मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती असल्यानं मॉन्सून जम्मू, काश्मीर, लदाख, गिलगिट, बाल्टीस्तान, मुज्जफराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात राज्याच्या उर्वरित भागातून मॉन्सून माघार घेईल. तर पुढील २ ते ३ दिवसांत पूर्व उत्तराखंड, पूर्व मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Procurement: राज्यात ७.६१ लाख टन हरभरा खरेदीला मंजुरी

Vidarbha Irrigation Update: शासन लेखी विदर्भातील सिंचन अनुशेष संपुष्टात

Kidney Trafficking: किडनी तस्करी रॅकेटमधील आरोपींना ‘मकोका’ लावा

Irrigation Subsidy Issue: मराठवाड्याला अनुशेष अनुदानाचा वाटा कमीच

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढणार

SCROLL FOR NEXT