Heat Wave Agrowon
हवामान

Heat Wave : उन्हाचा चटका पुन्हा वाढणार; कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढला

Weather Update : राज्यात मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्यातील पावसाळी वातावरण आता निवळले. त्यामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्यातील पावसाळी वातावरण आता निवळले. त्यामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली.

हवामान विभागाने आज राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पावसाळी वातावरणामुळे काही भागात सकाळी गारवा जाणवत होता. पण पावसाळी वातावरण निवळल्यानंतर पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढला. राज्यातील बहुतांशी भागात कमाल तापमान पुन्हा 37 अंश सेल्सिअस दरम्यान पोचले.

तर सोलापूर येथे मागील 24 तासातील उच्चांकी 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर नगर येथे मागील 24 तासातील सर्वात कमी 13.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पश्चिम विदर्भ आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती उत्तर तेलंगणा परिसरावर सक्रिय आहे. या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. मध्य प्रदेशापासून दक्षिण आसामपर्यंत हवेचा कमी दाब पट्टा तयार झाला आहे. राज्यात सुरू असलेला वादळी पाऊस उघडीप देण्याचे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Rain: विदर्भात ४ दिवस पावसाचा अंदाज; राज्यभरात बुधवारी आणि गुरुवारी पूर्व मोसमी पावसाची शक्यता

Kabul Airstrike Attack: काबुलमध्ये पाकिस्तानचा हॉस्पिटलवर एअर स्ट्राईक; ४०० हून अधिक मृत्यू, नशामुक्ती केंद्र उद्ध्वस्त

Agriculture Irrigation Water: गिरणा, तापीतून आवर्तनाने दिलासा

Farmer Hunger Strike: शेतकरी प्रश्नांसाठी गुरुवारी एकदिवसीय उपोषण

Farm Labour: सालगड्यांचा मेहनताना ठरणार गुढीपाडव्याला

SCROLL FOR NEXT