Heat  Agrowon
हवामान

Heat Wave : राज्यात उन्हाचा चटका वाढतोय; राज्यातील अनेक ठिकाणी तापमान ४० अंशाच्या पुढे

Weather Update : पुढील पाच दिवसांमध्ये ऊन आणखी वाढणार, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : सध्या महाराष्ट्रासह गुजरात आणि इतर काही राज्यांमधील काही भागातील सरासरी तापमानात ३ ते ४ अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील तापमान ४० ते ४२ अंशाच्या दरम्यान पोचले, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. तसेच पुढील पाच दिवसांमध्ये ऊन आणखी वाढणार, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 


सध्या राज्यातील विदर्भ, मराठवडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरासरी तापमानात चांगलीच वाढ झाली. तर देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद गुजरातमधील भूज येथे झाली. येथे ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान सोलापूर येथे होते. सोलापुरात ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. मालेगाव येथेही ४१ अंश सेल्सिअस तापमान होते. तर अनेक ठिकाणी तापमानाने ३९ अंशाची पातळी पार केली. 

पूर्व विदर्भापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक पर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत आहेत.

तर उन्हाचा चटका वाढतच असून, दुपारच्या वेळी झळा असह्य होत उकाड्यात वाढ झाली आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३८ अंशांच्या पुढे आहे. राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

Turmeric Price Issues: हळद दरप्रश्नी कायमस्वरूपी उपायोजनांसाठी बैठक घ्यावी

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा १०० कोटी ४५ लाख २० हजार रुपये विमा परतावा देय

Spice Crops Farming: तीन तालुक्यांत मसाला पिकांवर भर

Gokul Dudh Sangh: 'गोकुळ'वरून राजकीय वादाची ठिणगी; दूध संघावर प्रशासक की निवडणूक, नेमकं काय ठरलं?

SCROLL FOR NEXT