Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Cold Season : उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात गारठा वाढला

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : पाकिस्तानवरून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात घट होत आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात गारठा वाढला आहे. बुधवारी (ता. ११) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याच्या नीचांकी ५.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १२) राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्‍चिमी चक्रावात आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका टिकून आहे. बुधवारी (ता. ११) पूर्व राजस्थानच्या ‘सिकार’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील हंगामातील नीचांकी १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातही गारठा वाढत आहे. धुळ्यासह निफाड, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे तापमान १० अंशांच्या खाली आले आहे.

बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३४.५ अंश तापमानाची नोंद झाली. स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असला तरी दिवसभर वारे वाहत असल्याने उन्हाचा चटका कमी-अधिक होत आहे. सूर्यास्तानंतर हवेतील गारठा अधिक वाढत आहे. आज (ता. १२) किमान तापमानातील घट आणि थंडी कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बुधवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २९.४ (१३.१), अहिल्यानगर २८ (१२.६), धुळे २७ (५.८), जळगाव २९.३ (१०.२), जेऊर ३२ (१३), कोल्हापूर २९.६ (१९.८), महाबळेश्‍वर २५.८ (१५), मालेगाव २५ (१४.२), नाशिक २६.६ (१०.४), निफाड २५.८ (९), सांगली ३०.४ (१९.१), सातारा ३०.२ (१६), सोलापूर ३२ (१८.८), सांताक्रूझ ३३.८ (२०), डहाणू २८.२ (१७.५),

रत्नागिरी ३४.५ (२२.२), छत्रपती संभाजीनगर २७.५ (१२.४), धाराशिव ३१.६ (१५.७), परभणी २८.३ (१२.४), परभणी कृषी विद्यापीठ २७.९ (१०.५), अकोला २९ (१२.८), अमरावती २८.६ (१२.५), भंडारा २७ (११.४), बुलडाणा २७.६ (१२.०), ब्रह्मपुरी ३०.२ (११.१), चंद्रपूर २९ (१२), गडचिरोली २७.२ (१०.४), गोंदिया २६.९ (९.४), नागपूर २८.१ (१०), वर्धा २८ (१०), वाशीम ३२.८ (-), यवतमाळ ३१ (-).

ठळक कमी दाबाचे क्षेत्र कायम

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली आज (ता. १२) वायव्य दिशेकडे सरकून तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Loss: दोन एकरांतील केळी पीक कापून टाकले

Water Management: बंधाऱ्यांतील पाण्याने बहरणार उन्हाळी पिके

Forest Protection: सातपुड्यात डिंकासाठी वणवे पेटविण्याचे प्रकार

CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची कापूस खरेदी कासव गतीने

Lumpy Skin Disease: संभाजीनगर, जालना, बीडमध्ये ५४५ पशुधनाला ‘लम्पी’ची बाधा

SCROLL FOR NEXT