Weather Update Agrowon
हवामान

Vidarbha Temperature Increases : विदर्भात सूर्य तळपला, चटका वाढला

Weather Forecast : वादळी पावसाचा अंदाज कायम

Team Agrowon

Pune Weather News : वादळी पावसाने (Story Rain) उघडीप देताच, राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. सूर्य तळपल्याने विदर्भात तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पार गेला आहे.

उन्हाच्या चटक्या बरोबरच उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. आज (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात कडक उन्हाळा जाणवू लागला असून, बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया, ब्रह्मपुरी, वर्धा आणि यवतमाळ येथे तापमान ४३ अंशांच्या पार गेले आहे.

तर अकोला, अमरावती, वाशीम येथे तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वर सरकला आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३४ ते ४२ अंशांच्या दरम्यान असून, किमान तापमान १९ ते २७ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नैॡत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे.

मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे.

आज (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा कायम आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३९.२ (२०.४), जळगाव ४१.६ (२२.५), कोल्हापूर ३९.१ (२४.२), महाबळेश्‍वर ३२.८ (१९.४), नाशिक ३९.१ (२१.८), निफाड ४०.२ (१८.२), सांगली ३९.६ (२४.१), सातारा ३८.८ (२३.७), सोलापूर ४१.८ (२५), सांताक्रूझ ३७.१ (२५.६), डहाणू ३५.५ (२५.५), रत्नागिरी ३४.१ (२५.१), छत्रपती संभाजीनगर ३९.८ (२२.५), नांदेड - (२६), परभणी ४१.७ (२५), अकोला ४२.८ (२३.८), अमरावती ४२.८(२४.१), बुलडाणा ३९.२ (२४), ब्रह्मपुरी ४३.२ (२७.२), चंद्रपूर ४३.६ (२५.०), गडचिरोली ४०.६ (२४), गोंदिया ४३.२ (२६.५), नागपूर ४१.२ (२५.९), वर्धा ४३ (२३), वाशीम ४२ (२१.६), यवतमाळ ४३ (२४).


वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : जळगाव, नगर.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: वादळी पावसाचा ५ दिवस अंदाज; विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये २ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Jalgaon ZP: ‘झेडपी’त चार वर्षांपासून प्रशासकराज

Fertilizer License Suspension: बुलडाण्यातील आठ कृषी सेवा केंद्रांचे खतविक्री परवाने निलंबित

DA Hike: केंद्रीय कमर्चाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात २ टक्के वाढ, किती वाढेल पगार?

Child Marriage Prevention: अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

SCROLL FOR NEXT