Summer Heat Agrowon
हवामान

Summer Heat : राज्यासह देशभरात उन्हाचा चटका वाढणार ; पारा ४२ अंशावर जाण्याची शक्यता

Latest Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापामानातील चढ-उतार सुरूच आहेच. उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा चटका असह्य झाला आहे.

Team Agrowon

Summer Heat Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापामानातील चढ-उतार सुरूच आहेच. उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा चटका असह्य झाला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

त्यातच काही भागात ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही चांगलीच वाढ झाली आहे. अशातच आता पुढील दोन दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

देशातील अनेक राज्यांमधील तापमानाचा पार ४५ अंशाच्या पार गेल्याचे चित्र असून अनेक राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज (ता. १९) कमाल तापमान ४२ अंश तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअ राहण्याचा अंदाज आहे.

तर राजस्थानमधील तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जोधपूर, बिकानेरमध्ये तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात पारा ४० पार

राज्यातील विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा ४० पार गेला आहे. मराठवाडा, विदर्भाच्या तुलनेत कमाल तापमान कमी असले तरी आर्द्रतेमुळे कोकण किनारपट्टीवर अधिक उकाडा जाणवत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरूवारी ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले. अकोल्यात ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये तापमान ४२ अंशाच्या पार जाण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आण त्रिपुरामधील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अंदमान आणि निकोबार, पश्चिम बंगाल, केरळमध्ये हलका पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आला आहे. तर हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मिर आणि लडाखमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT