Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : तापमानाचा पारा ३७ अंशांपार

Summer Heat : राज्यात कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपार आहे. त्यामुळे उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपार आहे. त्यामुळे उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. उन्हाची ताप आणि उकाड्यात वाढत असतानाच किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. आज (ता. १०) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत.

मराठवाडा आणि पूर्व विदर्भात अंशतः ढगाळ हवामान होत असून, उन्हाचा चटका वाढल्याने घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.४ (१४.४), धुळे ३४.५ (१२.५), जळगाव ३४.८ (१५.४), कोल्हापूर - (२०.९), महाबळेश्वर ३१.१ (१७.२), मालेगाव - (१६.२), नाशिक ३३.९ (१४.६), निफाड ३२.६ (१०.१), सांगली ३७.३ (२०.४), सातारा - (१७.३), सोलापूर ३९.१ (२०.२), सांताक्रूझ ३४.६ (२०.०), डहाणू २९.९ (२०.७), रत्नागिरी ३३.१ (१८.९),

छत्रपती संभाजीनगर ३३.२ (१८.२), नांदेड ३६.४ (१९.६), परभणी ३६.५ (१९.६), अकोला ३६.३ (१६.५), अमरावती ३५.६ (२०.०), बुलडाणा ३३.४ (१७.०), ब्रह्मपुरी ३७.० (१९.६) चंद्रपूर ३८.० (१८.४), गडचिरोली ३५.६ (१९.०), गोंदिया ३४.० (१७.४), नागपूर ३४.८ (१८.५), वर्धा ३७.० (१८.८), वाशीम ३७.० (१६.२), यवतमाळ ३८.० (२०.५).

३७ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमानाची ठिकाणे :

सोलापूर ३९.१, चंद्रपूर ३८, यवतमाळ ३८, सांगली ३७.३, ब्रह्मपुरी ३७, वर्धा ३७, वाशीम ३७.

सोलापुरात उच्चांकी ३९.१ तापमान

शनिवारी (ता. ९) किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या पार गेला आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात कमाल तापमान ३७ अंशांच्या वरच आहे. आज (ता.१०) कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT