Weather Update  Agrowon
हवामान

Maharashtra Weather Forecast : राज्यात तापमानात चढ-उतार वाढण्याची शक्यता

Weekly Weather Update : या आठवड्यात कमाल व किमान तापमानात चढ-उतार जाणवेल. रविवार, बुधवार व गुरुवारी किमान तापमानात काहीशी घसरण जाणवेल; तर मंगळवारी व शुक्रवारी किमान तापमानात काही प्राणात वाढ जाणवेल.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर रविवार ते मंगळवार (ता. २६ ते २८)  हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल इतका कमी  राहील. याचाच सरळ अर्थ असा, की किमान तापमान १.६ ते ३ अंश सेल्सिअसने कोकण व मध्य महाराष्ट्रात वाढ होईल; तर कमाल तापमानातही कोकण, उत्तर महाराष्ट्र व दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्रासह, मराठवाडा व विदर्भातही १.६ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल.

या आठवड्यात कमाल व किमान तापमानात चढ-उतार जाणवेल. रविवार, बुधवार व गुरुवारी किमान तापमानात काहीशी घसरण जाणवेल; तर मंगळवारी व शुक्रवारी किमान तापमानात काही प्राणात वाढ जाणवेल. सध्या हवामान स्थिर राहील. या आठवड्यात फार मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत.

सध्या सूर्याचे उत्तरायण सुरू असून, प्रतिदिनी दिवसाचा सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढत जाईल व रात्रीचा कालावधी कमी होत जाईल. प्रशांत महासागराचे पेरूजवळ समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान १७ अंश सेल्सिअस राहील; तर इक्वेडोरजवळ ते २५ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे ‘ला निना’चा प्रभाव कमी राहील. हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमानही २९ अंश सेल्सिअस राहण्यामुळे आकाश अल्पशा प्रमाणात ढगाळ राहील.

कोकण कमाल तापमान सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील; तर रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस; तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील.

आकाश सर्वच जिल्ह्यात निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ५३ ते ५९ टक्के; तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ६० ते ६२ टक्के इतकी अधिक राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रायगड व पालघर जिल्ह्यांत ३५ ते ४० टक्के; तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ती ४१ ते ४२ टक्के राहील.

कोकणातील सर्वच जिल्ह्यांत आंबामोहर मोठ्या प्रमाणात येऊन आंबा सेटिंग चांगले होईल. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ४ ते ६ किमी राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा पूर्वेकडून राहील; तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ

कमाल तापमान बुलढाणा व अकोला जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील; तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व वाशीम जिल्ह्यांत १२ अंश सेल्सिअस राहील; तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ६० ते ६२ टक्के राहील; तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ६५ ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ५० ते ५२ टक्के राहील; तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ५५ ते ५८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ व दिशा ईशान्येकडून सर्वच जिल्ह्यांत राहील.

मराठवाडा

कमाल तापमान हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील; तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव, बीड व परभणी जिल्ह्यांत १२ अंश सेल्सिअस राहील; लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस राहील; जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ५० ते ५२ टक्के राहील; बीड, नांदेड व परभणी जिल्ह्यांत ५५ ते ५६ टक्के राहील; तर धाराशिव व हिंगोली जिल्ह्यांत ती ५८ ते ५९ टक्के इतकी राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, नांदेड व बीड जिल्ह्यांत ४० ते ४२ टक्के राहील; तर लातूर, हिंगोली, परभणी व जालना जिल्ह्यांत ती ४४ ते ४५ टक्के आणि परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ती ४८ टक्के इतकी राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ८ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील; तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस राहील; तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ते १२ अंश सेल्सिअस राहील.

सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ५० ते ५२ टक्के राहील; तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ५४ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४१ ते ४३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ६ ते ७ किमी व दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ

कमाल तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील; तर यवतमाळ जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील; तर यवतमाळ जिल्ह्यात ते १३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ६० टक्के राहील; तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ६८ ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५६ ते ५८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ५ ते ६ किमी राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ

कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील; तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १२ अंश सेल्सिअस राहील; तर चंद्रपूर जिल्ह्यात ते १३ अंश सेल्सिअस आणि गडचिरोली जिल्ह्यात ते १४ अंश सेल्सिअस राहील.

आकाश सर्वच जिल्ह्यांत निरभ्र राहील. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७२ टक्के राहील; तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ७८ ते ८० टक्के राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६२ टक्के राहील; तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ती ६५ ते ६८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी सर्वच जिल्ह्यात राहील; तर दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

दक्षिण- पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील; तर सोलापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, सोलापूर जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ते १९ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.

सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सांगली जिल्ह्यात केवळ ४६ टक्के इतकी राहील; तर सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत ती ६० ते ६९ टक्के आणि सातारा, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत ७९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सातारा जिल्ह्यात २७ टक्के राहील; सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ती ३३ ते ३५ टक्के राहील आणि पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी व दिशा आग्नेतातयेकडून राहील.

कृषी सल्ला

सध्याचे हवामान बटाटा, गहू, हरभरा, मोहरी पिकांचे वाढीसाठी उपयुक्त राहील.

ऊसपिकात साखर निर्मितीस अनुकूल राहील. पिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन वाढीचे अवस्थेनुसार पाणी देणे फायद्याचे ठरेल.

सुरू उसाच्या लागवडीस सध्याचे हवामान अनुकूल राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण चांगले राहील.

टरबूज, खरबूज, उन्हाळी, भुईमूग, सूर्यफूल, तीळ उन्हाळी बाजरी, मूग या पिकांच्या पेरण्या करण्यास हवामान अनुकूल राहील.

हळद पिकाची परिपक्वता झाली असल्यास काढणीसाठी हवामान अनुकूल राहील.

आंबा मोहराची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः तुडतुडे नियंत्रणाकडे लक्ष द्यावे. सध्याचा काळ हा परागीभवनाचा असल्याने मधमाश्‍या आणि अन्य उपयुक्त मित्रकीटकाचा कालावधी वगळून फवारणीचे नियोजन करावे.

पिकांना पाणी वाढीचे अवस्थेनुसार द्यावे.

जनावरांना लाळ व खुरकूत रोग प्रतिबंधक लस पशुवैद्यकाकडून द्यावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी

Nisaka Protest: ‘निसाका’ बचावसाठी सर्वपक्षीयांचा एल्गार 

Pulses Sowing: बारामतीत कडधान्य क्षेत्रात यंदा वाढ

Satara Rain: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस

Mulshi Dam: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT