Winter Season
Winter SeasonAgrowon

Maharashtra Winter Weather: किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता

Winter Weather Forecast : सातत्याने होणारे ढगाळ हवामान, उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव यामुळे किमान तापमानाचा पारा १० अंशांपार आहे. परिणामी, राज्यात अद्यापही थंडीचा कडाका कमी आहे. राज्यात आकाश निरभ्र आकाश असून किमान तापमानात हळूहळू घट होत आहे.
Published on

Pune News: सातत्याने होणारे ढगाळ हवामान, उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव यामुळे किमान तापमानाचा पारा १० अंशांपार आहे. परिणामी, राज्यात अद्यापही थंडीचा कडाका कमी आहे. राज्यात आकाश निरभ्र आकाश असून किमान तापमानात हळूहळू घट होत आहे.

दक्षिण भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा (ईशान्य मॉन्सून) हंगाम दोन दिवसांमध्ये समाप्त होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे ईशान्य अरबी समुद्र पासून दक्षिण राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वायव्य भारतात १५० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. शनिवारी (ता.२५) राजस्थानातील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Winter Season
Maharashtra Winter: राज्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा

डिसेंबर महिन्यात तीव्र थंडीचा अनुभव घेतल्यानंतर नवीन वर्षात मात्र गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात पहाटे काहीसा गारठा, धुक्याची चादर आणि दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती पाहायला मिळत आहे. राज्यात थंडी गायब असतानाच उकाडा वाढल्याचे निदर्शनास येत आहे. शनिवारी (ता. २५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात किमान तापमान १० ते २० अंशांच्या दरम्यान आहे. शनिवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २६) राज्यात आकाश निरभ्र राहून, किमान तापमानात १ ते २ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Winter Season
Maharashtra Weather: राज्यात थंडीचा कडाका कमीच; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात वाढ

शनिवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३३.७---१५.५,अहिल्यानगर---३२.९,---१४.७धुळे---२९---१०.५जळगाव---३१.६---१४जेऊर---३५---१४.५, सांताक्रूझ---३३.४---२०.२ डहाणू---२७.९---१८.९ रत्नागिरी---३४---२०.६ छत्रपती संभाजीनगर---३२.८---१६.४ धाराशिव---३२.१---१३.४ परभणी---३३---१५.३ परभणी (कृषी)---३१.६---१२.९ अकोला---३३.९---१७.२ अमरावती---३३.२---१६.१ भंडारा---३२.६---१५ बुलढाणा---३१.४---१६.४

ब्रह्मपूरी---३५.२---१५.२ चंद्रपूर---३२---निरंक गडचिरोली---३२.४---१५ गोंदिया---३१.४---१५.८ नागपूर---३२.८---१५.५ वर्धा---३२.४---१५.२ वाशीम---३३.४---१९.६ यवतमाळ---३४.२---१८कोल्हापूर---३२.५---१८.१ महाबळेश्वर---२९.७---१७.४ मालेगाव---२९.२---१६ नाशिक---३१---१४.८ निफाड---३०.५---११.३ ,सांगली---३४.६---१६.३ सातारा---३४.६---१५.५ सोलापूर---३५.८---१८.१

सांताक्रूझ---३३.४---२०.२ डहाणू---२७.९---१८.९ रत्नागिरी---३४---२०.६ छत्रपती संभाजीनगर---३२.८---१६.४ धाराशिव---३२.१---१३.४ परभणी---३३---१५.३ परभणी (कृषी)---३१.६---१२.९ अकोला---३३.९---१७.२ अमरावती---३३.२---१६.१ भंडारा---३२.६---१५ बुलढाणा---३१.४---१६.४ ब्रह्मपूरी---३५.२---१५.२ चंद्रपूर---३२---निरंक गडचिरोली---३२.४---१५ गोंदिया---३१.४---१५.८ नागपूर---३२.८---१५.५ वर्धा---३२.४---१५.२ वाशीम---३३.४---१९.६ यवतमाळ---३४.२---१८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com