Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : दोन दिवसात थंडी वाढण्याचा अंदाज; राज्यातील काही भागात तापमानात झाली घट

Maharashtra Weather Forecast : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रहावामुळे राज्यात थंडी वाढण्याला मदत होत आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून थंडी काही प्रमाणात कमी जास्त होत आहे. मात्र पुढील दोन दिवसांमध्ये राज्यात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

Anil Jadhao 

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रहावामुळे राज्यात थंडी वाढण्याला मदत होत आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून थंडी काही प्रमाणात कमी जास्त होत आहे. मात्र पुढील दोन दिवसांमध्ये राज्यात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 

उत्तर भारतातील राज्यांमध्ये अनेक भागात थंडीचा कडाका कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे किमान तापमानही अधिक दिसत आहे. राजस्थानमधील चित्तोडगड येथे देशातील सपाट भुभागावरील निचांकी ५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ईशान्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. तर पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे.

राज्यातील तापमानातही मागील दोन दिवसांपासून चढ उतार सुरु आहेत. आज जळगाव येथे सर्वात कमी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.८ अंश सेल्सिअस तापमान होते.

राज्यातील १० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे कमी दिसत आहेत. बहुतांशी भागात किमान तापमानात वाढ झाली. तर काही भागात दुपारी काहीसा उकाडाही जाणवत असल्याची स्थिती आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Textile Park: यवतमाळ जिल्ह्यातील टेक्स्टाईल पार्कला मिळेना गती

Agrowon FPC Conference: नव्या दिशांवर झाले विचारमंथन

ED Files Chargesheet: रिलायन्स पॉवर, उपकंपन्यांविरुद्ध आरोपपत्र

Sugar Industry: दौंडमध्ये कारखान्यांचे ऊसदराबाबत मौनच

Custom Structure: पुढचे लक्ष्य आता सीमाशुल्क ‘शुद्धीकरणा’चे : निर्मला सीतारामन

SCROLL FOR NEXT