Summer Heat
Summer Heat Agrowon
हवामान

Summer Heat Update : तापमानाचा पारा ४० अंश पार

Team Agrowon

Weather Update Pune News : राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. मात्र तापमानाचा पारा सातत्याने चाळिशीपार असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. कमाल तापमानात पुन्हा वाढ झाल्याने, तसेच ढगाळ हवामानामुळे उकाड्यातील वाढ कायम आहे.

आज (ता. २०) तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक स्थिती असल्याने सोमवारी (ता. २२) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४३ तापमानाची नोंद झाली. तर विदर्भात उन्हाची ताप अधिक असून, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर येथे पारा ४२ अंशांच्या पार गेला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथेही ४२.७ अंश तापमानाची नोंद झाली असून, उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान होते. राज्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान झाले होते.

पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ ते उत्तर कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

आज (ता. २०) राज्यात कमाल तापमानात चढ-उतार कायम राहणार असून, उष्ण व दमट हवामानामुळे चटका आणि उकाडा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. विदर्भात पावसाला पोषक हवामान होत असून, सोमवारी (ता. २२) विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.५ (२२.६), जळगाव ४२.७ (२६.५), धुळे ४०.६ (२२.०), कोल्हापूर ३८.४ (२४.१), महाबळेश्वर ३३.१ (२०.१), नाशिक ३८.० (२२.३),

निफाड ४०.० (२५.२), सांगली ३९.८ (२३.५), सातारा ३९.६ (२२.६), सोलापूर ४१.६ (२६.९), सांताक्रूझ ३४.१ (२६.४), डहाणू ३४.५ (२७.९), रत्नागिरी ३४.७ (२६.५),

छत्रपती संभाजीनगर ४०.२(२४.०), नांदेड ४१.६ (२६.४), परभणी ४०.६ (२६.६), अकोला ४२.६ (२७.२), अमरावती ४२.६(२५.२), बुलढाणा ३९.७ (२५.५), ब्रह्मपूरी ४१.२ (२७.७),

चंद्रपूर ४२.४(२८.४), गडचिरोली -(२५.८), गोंदिया ४१.६ (२६.५), नागपूर ४२.२ (२५.६), वर्धा ४३.०(२९.०), वाशीम ४१.६(२६.०) यवतमाळ ४१.० (२६.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT