Summer Heat Agrowon
हवामान

Summer Heat : विदर्भात उन्हाचा चटका असह्य

Weather Update सूर्याची ताप वाढल्याने विदर्भात उन्हाचा चटका असह्य होत आहे. विदर्भात कमाल तापमानाचा पारा हंगामातील उच्चांकी पातळीवर असून, अकोला, अमरावती येथे उष्णतेची लाट आली आहे.

Team Agrowon

Summer Heat Update : सूर्याची ताप वाढल्याने विदर्भात उन्हाचा चटका असह्य होत आहे. विदर्भात कमाल तापमानाचा पारा हंगामातील उच्चांकी पातळीवर असून, अकोला, अमरावती येथे उष्णतेची लाट आली आहे.

आज (ता. १६) उन्हाची ताप टिकून राहणार असून, कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात उन्हाच्या वाढत्या झळा चांगल्याच तापदायक ठरत असल्याने उन्हाळी पिके, ऊस, फळबागा करपू लागल्या आहेत. उकाड्यातही वाढ झाल्याने अंगाची लाही लाही होत, असून उष्माघातामुळे जिवीतहानी वाढण्याचे शक्यता आहे.

सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४५.५ अंश सेल्सिअस, तर अमरावती येथे ४५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

नागपूर, वर्धा येथे पारा ४४.९ अंशांवर तर यवतमाळ, चंद्रपूर आणि जळगाव येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३६ ते ४३ अंशांच्या दरम्यान आहे.

दक्षिण हरियाणामध्ये समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली. आज (ता. १६) राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याबरोबरच, उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील 'मोचा' अति तीव्र चक्रीवादळ जमीनीवर येताच त्याची तीव्रता ओसरली आहे. सोमवारी (ता.१५) सकाळी ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. दुपारनंतर वादळाचे कमी दाब क्षेत्रात रुपांतर झाले.

सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३७.५ (२४.१), जळगाव ४३.२ (२७.५), धुळे ४२.४ (-), कोल्हापूर ३४.७ (२३.९), महाबळेश्वर ३०.८ (१७.८), नाशिक ३६.३ (२४.१),

निफाड ४१.८ (२५.२), सांगली ३७.४ (२३.०), सातारा ३७.० (२३.१), सोलापूर ४१.१ (२४.५), सांताक्रूझ ३३.७ (२८.०), डहाणू ३५.१ (२८.४), रत्नागिरी ३४.० (२६.५),

छत्रपती संभाजीनगर ४१.० (२३.४), नांदेड ४२.६ (२७.६), परभणी ४१.४ (२५.१), अकोला ४५.५ (२७.६), अमरावती ४५.४(२५.५), बुलढाणा ४०.८ (२६.२), ब्रह्मपूरी ४२.० (२५.६),

चंद्रपूर ४३.२(२६.०), गडचिरोली ४१.८(२४.४), गोंदिया ४२.५ (२३.५), नागपूर ४४.९ (२७.६), वर्धा ४४.९(२७.६), यवतमाळ ४३.५ (२७.७).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT