Summer Heat  Agrowon
हवामान

Summer Heat Update : उन्हाच्या चटक्याने विदर्भ भाजला

Weather Update : राज्यात उन्हाळा सुरू झाल्याने उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. उन्हाची ताप वाढल्याने विदर्भ भाजून निघाला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाळा सुरू झाल्याने उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. उन्हाची ताप वाढल्याने विदर्भ भाजून निघाला आहे. विदर्भातील अकोला येथे राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २७) राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

पूर्व विदर्भापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक पर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत आहेत. तर उन्हाचा चटका वाढतच असून, दुपारच्या वेळी झळा असह्य होत उकाड्यात वाढ झाली आहे.

मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला देशात उष्ण ठरले असून, अकोल्यात राज्याचे हंगामातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. वर्धा, अमरावती, मालेगाव, सोलापूर, यवतमाळ आणि परभणी येथे तापमान चाळीशीपार आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३८ अंशांच्या पुढे आहे. राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.९, धुळे ३९.०, जळगाव ३९.८, कोल्हापूर ३७.७, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४०.८, नाशिक ३७.७, निफाड ३६.८, सांगली ३८.७, सातारा ३८.४, सोलापूर ४०.६, सांताक्रूझ ३३.६, डहाणू ३३.४, रत्नागिरी ३३.५,

छत्रपती संभाजीनगर ३८.२, नांदेड ३९.४, परभणी ४०.०, अकोला ४१.०, अमरावती ४०.८, बुलडाणा ३८.०, ब्रह्मपुरी ३९.२, चंद्रपूर ३८.२, गडचिरोली ३६.०, गोंदिया ३७.८, नागपूर ३९.०, वर्धा ४०.८, वाशीम ३९.८, यवतमाळ ४०.२.

४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४१, वर्धा ४०.८, अमरावती ४०.८, मालेगाव ४०.८, सोलापूर ४०.६, यवतमाळ ४०.२, परभणी ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT