Summer Heat  Agrowon
हवामान

Weather Update : दिवसा चटका, रात्रही ठरतेय उष्ण

Summer Heat : सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. देशात अकोला उष्ण ठरत असून, राज्याचे हंगामातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. देशात अकोला उष्ण ठरत असून, राज्याचे हंगामातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बुलडाण्यात उष्णतेची लाट आली असून, अनेक ठिकाणी रात्री देखील उष्ण ठरत आहेत. आज (ता. २९) अकोला आणि बुलडाण्यात उष्ण लाटेचा, तर नांदेडमध्ये उष्ण रात्रीचा इशारा देण्यात आला आहे.

कमाल तापमान चाळिशी पार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. त्यानुसार बुलडाण्यात उष्ण लाट आली आहे. तर कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असताना, रात्रीच्या किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्ण लाट समजली जाते.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत उष्ण रात्री अनुभवायला मिळत आहेत. गुरुवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील सर्वाधिक तसेच राज्याचे हंगामातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मालेगावमध्येही पारा ४४२ अंशांवर पोहोचला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे. आज (ता. २९) अकोला आणि बुलडाण्यात उष्णतेची लाट येण्याचा, तर नांदेडमध्ये उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाची ताप वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गुरुवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३९.५, नगर ३९.८, धुळे ४१, जळगाव ४१.८, कोल्हापूर ३८.१, महाबळेश्‍वर ३२.१, मालेगाव ४२, नाशिक ३९.४, निफाड ३८.३, सांगली ३८.५, सातारा ३९.१, सोलापूर ४१.३, सांताक्रूझ ३२, डहाणू ३३.३, रत्नागिरी ३२.२,

छत्रपती संभाजीनगर ३९.२, बीड ४०.१, नांदेड ४०.२, परभणी ४१.२, अकोला ४२.८, अमरावती ४१.२, बुलडाणा ४१, ब्रह्मपुरी ४०.२, चंद्रपूर ३९, गडचिरोली ३८, गोंदिया ३७.६, नागपूर ३९, वर्धा ४०.५, वाशीम ४१.४, यवतमाळ ४१.

वादळी पावसाची शक्यता

मध्य प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बिहार आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. २९) दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

- उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

अकोला, बुलडाणा.

- उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) :

नांदेड.

४१ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४२.८, मालेगाव ४२.०, जळगाव ४१.८, वाशीम ४१.४, सोलापूर ४१.३, परभणी ४१.२, अमरावती ४१.२, धुळे ४१, बुलडाणा ४१, यवतमाळ ४१.

- वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सोलापूर धाराशिव, लातूर, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT