Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold Wave : राजस्थानमधील सिकर येथे निचांकी १ अंश तापमानाची नोंद ; थंडीची लाट कायम

Weather Forecast : पाकिस्तानवरून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारत थंडीची लाट आहे. राज्यातही थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात मागील तीन दिवसांपासून गारठा वाढला.

Anil Jadhao 

Pune News : पाकिस्तानवरून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारत थंडीची लाट आहे. राज्यातही थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात मागील तीन दिवसांपासून गारठा वाढला. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याच्या नीचांकी ५.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

पश्‍चिमी चक्रावात आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी चांगलीच वाढली. आज पूर्व राजस्थानच्या ‘सिकार’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील हंगामातील नीचांकी १ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातही गारठा वाढत आहे. धुळ्यासह, परभणी, नागपूर, निफाड, गोंदिया, वर्धा येथे तापमान १० अंशांच्या खाली आले आहे.

राज्यात थंडीचा कडाका कायम असतानाच काही ठिकाणी कमाल तापमानही ३५ अंशाच्या दरम्यान आहे. आज मुंबईतील सांताक्रुझ येथे कमाल ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच डहाणू येथेही ३५.१ अंश तापमान होते. रत्नागिरीतही ३५.१ अंश सेल्सिअस तापमनाची नोंद झाली. 

सध्य मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांशी भाग आणि विदर्भात थंडीचा कडाका चांगलाच वाढला. थंडी पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NAFED Soybean Procurement: नाफेडच्या दोन केंद्रांवर ६८२ क्विंटल सोयाबीन खरेदी

Wildlife Safety: बिबट्या दिसताच वाजणार ‘सायरन’

Ginger Turmeric Crops: आले, हळद पिकांसाठी आता संघर्ष करणार

Cyclone Ditwah: ‘डिटवाह’नं श्रीलंकेतील शेती उद्ध्वस्त; मत्स्यव्यवसाय, ग्रामीण उपजीविकेवर गंभीर परिणाम- एफएओ अहवाल

Rural Development: वसा गावातील नावीन्यपूर्ण उपक्रम अभिनंदनीय

SCROLL FOR NEXT