
Pune News : विषुववृत्तीय प्रशांत महासागरात पुढील तीन महिन्यांत ‘ला निना’ची स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा ‘ला-निना’ तुलनेने कमकुवत आणि अल्प कालावधीसाठी राहण्याचे संकेत असल्याचे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे.
जागतिक हवामान संस्थेच्या ‘ग्लोबल प्रोड्यूसिंग सेंटर्स ऑफ लॉन्ग-रेंज फोरकास्ट्स’ या विभागाच्या सुधारित अंदाजानुसार डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत प्रशांत महासागराचे पृष्ठभागाचे तापमान सध्याच्या तटस्थ स्थितीपासून ‘ला निना’ स्थितीत संक्रमण होण्याची ५५ टक्के आहे. तसेच फेब्रुवारी-एप्रिल २०२५ या कालावधीत तापमान तटस्थ स्थितीत येण्याची शक्यताही ५५ टक्के आहे.
मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमान मोठ्या प्रमाणात थंड होणे म्हणजे ‘ला निना’ स्थिती होय. उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये ‘ला-निना’ व ‘एल-निनो’ या स्थिती वारा, हवेचे दाब आणि पाऊस आदी वातावरणीय घटकांत परस्पर विरोधी प्रभाव पडतात. यामुळे जागतिक तापमानात वाढ होण्याबरोबरच तीव्र हवामान घटना, हंगामी पाऊस आणि तापमानावरही परिणाम होत आहे.
नोव्हेंबर २०२४ च्या अखेरपर्यंतची प्रशांत महासागरातील सागरी आणि वातावरणीय निरीक्षणे ही मे महिन्यापासून कायम असलेली ‘एन्सो-तटस्थ’ (एल-निनो नाही, ला-निना ही नाही) परिस्थिती दर्शवत आहेत. प्रशांत महासागराच्या मध्य ते पूर्व विषुववृत्तीय भागात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा थोडे कमी आहे.
मात्र हे कमी तापमान अद्यापही ठरावीक ‘ला-निना’ स्थितीच्या उंबरठ्यावर पोहोचलेले नाही. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२४ च्या सुरुवातीच्या काळात दिसून मिळलेले जोरदार पश्चिमी वारे हे ‘ला-निना’ विकासासाठी अनुकूल नसल्याचे दिसून आले आहे.
जागतिक हवामान संस्थेच्या सरचिटणीस सेलस्टे साऊलो म्हणाल्या, की २०२४ वर्षाची सुरुवात ‘एल-निनो’ने झाली आणि ते आतापर्यंतचे सर्वांत उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. जरी ‘ला -निना’ स्थिती तयार झाली तरीही तिचा अल्पकालीन शीतकरण प्रभाव वातावरणातील हरितगृह वायूंच्या तापमानवाढीच्या प्रभावाचा कमी करण्यास अपुरा असेल. मेपासून ‘एल-निनो’ किंवा ‘ला-निना’ परिस्थिती नसतानाही, विक्रमी पाऊस आणि पूर यांसह अत्यंत विलक्षण हवामानाच्या घटना अनुभवायला मिळत आहेत. या घटना बदलत्या हवामानत नवीन परिमाणे ठरत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.