Winter Weather Agrowon
हवामान

Hawaman Andaj : राज्यात निचांकी तापमानाची नोंद; राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज

Cold Weather Update : महाराष्ट्रावर आज हवेचा दाब अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीत चढ- उतार जाणवत आहे. हवेच्या दाबात वाढ होताच किमान व कमाल तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढते.

अनिल जाधव

Pune News : राज्याच्या काही भागात तापमानात चढ उतार सुरुच आहेत. राज्यात पहिल्यांदाच तापमान १० अंशाच्या खाली गेले असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काळात राज्यातील अनके भागात तापमानातील चढ उतार कायम राहिल. तर काही ठिकाणी थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रावर आज हवेचा दाब अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीत चढ- उतार जाणवत आहे. हवेच्या दाबात वाढ होताच किमान व कमाल तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढते. राज्याच्या बहुतांश भागात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. ईशान्येकडून येणारे थंड वारे थंडीची तीव्रता वाढवतील. त्याच वेळी राज्याच्या सर्व भागांत दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल.

निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि धुळे येथे आजही १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठात यंदाच्या हंगामातील सर्वात कमी ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान कोरडे व थंड राहण्याचा अंदाज आहे. ज्या भागात सकाळची सापेक्ष आर्द्रता अधिक असेल, तिथे पहाटेपासून सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात धुके जाणवेल. राज्यातील बहुतांशी भागात थंडी वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमान १५ अंशांपेक्षाही कमी आहे. तर १३ अंशांपेक्षा कमी तापमान असलेल्या ठिकाणांचीही संख्या लक्षणीय आहे.

श्रीलंकेपासून पूर्वेस हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे क्षत्र उद्या पश्‍चिम दिशेस सरकून त्याचा केंद्रबिंदू श्रीलंकेवर राहण्याचा अंदाज आहे. बुधवार हे लहानसे चक्रिय वादळ विरून जाणार असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Disaster Prediction : नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देण्यासाठी 'अर्ली वॉर्निंग सिस्टिम'; मृत्यूचं प्रमाण घटलं, केंद्र सरकारचा दावा

Soybean Procurement: बीड जिल्ह्यात ३१ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

Marathwada Water Storage: मराठवाड्यातील ८९० प्रकल्पांत ९६.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Putin India Visit: पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर, कृषीसह महत्त्वाचे करार शक्य

Soil Health: मातीचे ते मोल किती?

SCROLL FOR NEXT