Rain Agrowon
हवामान

Rain Alert : पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस

Rain Update : मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील ठाणे जिल्ह्यातील नयाहडी येथे सर्वाधिक ९२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

Team Agrowon

Pune News : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील ठाणे जिल्ह्यातील नयाहडी येथे सर्वाधिक ९२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे भात पिकांचे नुकसान होत असले तरी मध्य महाराष्ट्रातील नागरिकांची धावपळ उडाली आहे.

मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. कोकणातील ठाणे जिल्ह्यातील धसई येथे ६४ मिलिमीटर, तर बलकुम, भिवंडी, खारबाव येथे ६१ मिलिमीटर, तर देहरी, सरळगाव येथे ५५ मिलिमीटर पाऊस पडला. रत्नागिरीतील बुरोंडी येथे ३५ मिलिमीटर, तर आंगवली, पुनस ३१, देवरुख ३२ मिलिमीटर, सिंधुदुर्गमधील आबेरी ४६, वालावल, वैभववाडी, येडगाव ३४, पिंगुळी ३९ मिलिमीटर, तर पालघरमधील विरार येथे ३० मिलिमीटर पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मॉन्सूनोत्तर पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. आंबेगाव येथे सर्वाधिक ५५ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे भात पिकांना दिलासा मिळत असला तरी बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांच्या काढणीस अडथळे येत असून शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.

सोलापुरातील माळशिरस, अकलूज येथे ४५ मिलिमीटर पाऊस पडला असून, टेंभुर्णी येथे ३१ मिलिमीटर, लऊळ ३७, लवंग ३०, म्हाळुंग ३८ मिलिमीटर, साताऱ्यातील तळमावले, उंडाळे येथे ५० मिलिमीटर, तर मलकापूर ४१, मायणी ५८, मलवडी ४७ मिलिमीटर, सांगलीतील वाळवा येथे ४७ मिलिमीटर, तर कुरलप, चिकुर्डे ५८, कोकरूड ५७, सागाव ४२ मिलिमीटर, कोल्हापुरातील मलकापूर येथे ५६ मिलिमीटर, तर आंबा येथे ३८ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे शेती कामांमध्ये अडथळे येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT