Weather Forecast  Agrowon
हवामान

Rain Forecast : पालघर, पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Weather Forecast Maharashtra : मॉन्सून चांगलाच सक्रिय झाल्याने कोकण, घाटमाथ्यावर तुफान पाऊस कोसळत आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : मॉन्सून चांगलाच सक्रिय झाल्याने कोकण, घाटमाथ्यावर तुफान पाऊस कोसळत आहे. आज (ता. २२) पालघरसह, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.

तर कोकण, घाटामाथ्यासह, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, रायसेन, छिंदवाडा, दुर्ग, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

महाराष्ट्राच्या मध्य भागातून असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

कोकण, घाटमाथ्यावर पाऊस सुरूच असून, राज्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २२) कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे.

पालघर, पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याचा घाटमाथा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर तळ कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट), उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

अति जोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

पालघर, पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम.

जोरदार पाऊस, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat History: दहा हजार वर्षांचा अन्नसाथी

Dragon Fruit Farming: ड्रॅगन फ्रूट ठरू शकेल राज्यातील ‘फ्यूचर क्रॉप’

India Heatwave 2026: धगधगती भूमी

Forest Fire Damage: राजधेर डोंगरावरील वणव्यात वनसंपदा खाक

Book Controversy: ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद तीव्र

SCROLL FOR NEXT