Kolhapur Rain Update agrowon
हवामान

Weather Forecast : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधारेचा ‘रेड अलर्ट’

Monsoon Rain : मध्य प्रदेशमध्ये चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती सक्रिय आहे. महाराष्ट्रापासून उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

अमोल कुटे

Pune News : मॉन्सूनचे आगमन झालेल्या भागात राज्यात पाऊस जोर धरू लागला आहे. आज (ता. ९) सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’, तर रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य प्रदेशमध्ये चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती सक्रिय आहे. महाराष्ट्रापासून उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच मॉन्सूनची वाटचाल सुरूच असल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्याच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. उर्वरित उन्हाचा चटका आणि राज्यात उकाडा कायम असून, दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. ९) कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार, रत्नागिरी जिल्ह्यासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) :

कोकण :

मालवण ११०, पालघर ९०, दोडामार्ग, वैभववाडी प्रत्येकी ७०, भिवंडी ६०, कुडाळ ५०, रामेश्‍वर ४०, सुधागड पाली, चिपळूण प्रत्येकी ३०, देवगड, गुहागर, खालापूर, संगमेश्‍वर, वाकवली, मोखेडा, मंडणगड प्रत्येकी २०.

मध्य महाराष्ट्र :

कसबे डिग्रज ६०, सांगली, सुरगाणा, इगतपुरी प्रत्येकी ५०, जत ४०, गगनबावडा, अटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, हर्सूल प्रत्येकी ३०, शिराळा, राहुरी, भडगाव, संख, सातारा, मीरज, नाशिक, सटाणा, शाहूवाडी, चोपडा सोलापूर प्रत्येकी २०.

मराठवाडा :

धालेगाव ६०, माणवत ४०, शिरूर कासार ३०, गंगापूर, माजलगाव, सोयोगाव प्रत्येकी २०.

विदर्भ :

जेवती ७०, सिरोंचा ४०, डिग्रस, मालेगाव, सेलू, राजुरा प्रत्येकी २०.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT