Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचे वातावरण ; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज 

Weather Update : राज्यात ही परिस्थिती पुढील ५ दिवस राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात ऊन्हाचा चटका वाढत आहे. तर काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. राज्यात ही परिस्थिती पुढील ५ दिवस राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. 


हवामान विभागाने आज पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला. तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काही भागात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. 

उद्या म्हणजेच बुधवारी हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील वाशीम, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला.

तर कोकणातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील बुलडणा आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT