Weather Update  Agrowon
हवामान

Monsoon 2024 : यंदा पाऊसकाळ उत्तम

Indian Meteorological Department : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक (१०६ टक्के) पावसाचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. १५) जाहीर केले.

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक (१०६ टक्के) पावसाचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. १५) जाहीर केले.

या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. संभाव्य ‘ला निना’ स्थिती, धन ‘आयओडी’ आणि युरेशियातील कमी हिमाच्छादन मॉन्सूनच्या चांगल्या पावसासाठी अनुकूल ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सून हंगामातील पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८७ सेंटीमीटर म्हणजेच ८७० मिलिमीटर आहे. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

मॉन्सून हंगामातील पहिल्या टप्प्याचा अंदाज वर्तविताना प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान, भारतीय महासागरातील द्वी-धृविता (इंडियन ओशन डायपोल - आयओडी), आणि उत्तर गोलार्धातील हिमाच्छादन हे घटक विचारात घेतले आहेत. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३१ टक्के), तर दुष्काळाची शक्यता अवघी २ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. तर वायव्य, पूर्व भारतातील काही राज्य, तसेच पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

मे अखेरीस हवामान विभागनिहाय सुधारित अंदाज जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात देशात सरासरीपेक्षा ९४.४ टक्के, तर महाराष्ट्रात ९७ टक्के पाऊस पडला होता.

मॉन्सूनच्या पावसाची शक्‍यता

पावसाचे प्रमाण शक्‍यता

९० टक्‍क्‍यांहून कमी २ टक्के

९० ते ९६ टक्के ८ टक्के

९६ ते १०४ टक्के २९ टक्के

१०४ ते ११० टक्के ३१  टक्के

११० टक्‍क्‍यांहून अधिक ३० टक्के

मॉन्सूनच्या सुरुवातीला ‘एल निनो’ ओसरणार

विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या मध्यम ‘एल-निनो’ स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडल्सनुसार मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीलाच ‘एल निनो’ स्थिती निवळण्याची शक्यता आहे. तर मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट ते सप्टेंबर ‘ला निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत.

महाराष्ट्रात यंदा आबादानी

यंदाच्या मॉन्सून हंगामात महाराष्ट्रात दमदार पावसाचे संकेत आहेत. मॉन्सून पावसाच्या वितरणाबाबत जाहीर केलेल्या नकाशानुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील पावसाबाबत (Rain) या अंदाजामध्ये स्पष्टता नाही. मे अखेरीस सुधारित अंदाजात मॉन्सूनचे महाराष्ट्रातील वितरण आणखी स्पष्ट होऊ शकणार आहे.

‘ला निना’ स्थिती, धन ‘आयओडी’ अनुकूल ठरणार

बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील (Arabian Sea) तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या सामान्य स्थितीत आहे. मॉन्सून हंगामात आयओडी ‘धन’ पातळीवर (पॉझिटिव्ह) राहण्याची शक्यता आहे.

यातच उत्तर गोलार्धातील युरेशियामध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी हिमाच्छादन होते. संभाव्य ‘ला निना’ स्थिती, धन ‘आयओडी’ आणि युरेशियातील कमी हिमाच्छादन मॉन्सूनच्या चांगल्या पावसासाठी अनुकूल मानले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार

Saline Land: जमीन क्षारपड मुक्तीसाठी ‘श्री दत्त पॅटर्न’ला शासनाची मदत

Tuti Cultivation: सांगली जिल्ह्यात ‘महारेशीम’ची ९७ एकरांवर तुती लागवड

Electricity Bill Dues: ग्रामपंचायतींच्या वीजबिल थकबाकीची अडचण कायम 

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

SCROLL FOR NEXT