Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: दोन दिवसांनंतर पावसाचा जोर वाढणार; पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवड्यात पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Forecast: मागील आठवडाभर राज्यात पावसाचे प्रमाण कमीच राहीले. मात्र, आजपासून काही भागात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News: मागील आठवडाभर राज्यात पावसाचे प्रमाण कमीच राहीले. मात्र, आजपासून काही भागात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडडिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भाताली इतर जिल्हे, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. तर कोकण कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

बुधवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली तर मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर  जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

गुरुवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

शुक्रवारी विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.  तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri College Land Issue: कृषी महाविद्यालयातील आठ एकर जमीन नापीक

Hingoli Turmeric Market: हिंगोली बाजार समितीत हळदीची ३ लाख १९ हजार क्विंटल आवक

Fuel and Fertilizer Prices: इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार

Cotton Procurement Policy: कापूस खरेदीऐवजी भावांतर राबविणार

Maharashtra Heat Update: राज्यात उष्णतेची लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT