Rain Update  Agrowon
हवामान

Monsoon Rain: विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य प्रदेशात पाऊस उघडीप देण्याची शक्यता

Weather Update : हवामान विभागाने पुढील ४ दिवस काही भागात पावसाचा अंदाज दिला. तर विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही व्यक्त केली.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झाला. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. हवामान विभागाने पुढील ४ दिवस काही भागात पावसाचा अंदाज दिला. तर विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही व्यक्त केली. 

माॅन्सून ट्रफ सध्या आपल्या सर्वसाधारण जागेवर आहे. तर वायव्य मध्य प्रदेश आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात हलक्या सरी पडत आहेत. विदर्भातील अमरावती, नागपूर आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

उद्यापासून विदर्भात पाऊस वाढत जाण्याचा अंदाज आहे. उद्या चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बुधवारीही विदर्भातील काही भागात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. 

गुरुवारी आणि विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला. कोकणातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची कापूस खरेदी कासव गतीने

Lumpy Skin Disease: संभाजीनगर, जालना, बीडमध्ये ५४५ पशुधनाला ‘लम्पी’ची बाधा

Agriculture University: शिर्के प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीकडे कृषिशास्त्रज्ञांचे लक्ष

Pomegranate Prices: डाळिंबाला किलोला १२० ते १६० रुपये दर

Farmer Suicides: बीड जिल्ह्यात दर ३६ तासाला एका शेतकरी आत्महत्येची नोंद

SCROLL FOR NEXT