Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain : बहुतांश जिल्ह्यांत पाऊस सरासरी गाठणार

Rain Update : संपूर्ण देशामध्ये लेह, लडाख आणि पूर्व तमिळनाडू, पूर्वोत्तर राज्ये वगळता जुलै महिन्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे.

Team Agrowon

माणिकराव खुळे

Weather News : संपूर्ण देशामध्ये लेह, लडाख आणि पूर्व तमिळनाडू, पूर्वोत्तर राज्ये वगळता जुलै महिन्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे.

सांख्यिकीच्या टरसाइल वर्गीकृत श्रेणीनुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यात पुढीलप्रमाणे पाऊस जाणवतो. यामध्ये दोन श्रेणी पात्र ठरल्या आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही.

मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, सांगली कोल्हापूर, पश्‍चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के इतक्या पावसाची शक्यता जाणवते.दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा, सोलापूर जिल्ह्यांच्या फलटण, माण, खटाव, माळशिरस, पंढरपूर तालुक्यांच्या भागात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलडाणा, यवतमाळ जिल्हा आणि या जिल्ह्यांच्या लगतच्या परिसरात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीइतका म्हणजे ९६ ते १०४ टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता जाणवते.

कमाल तापमान

जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे ३ वाजताचे कमाल तापमान हे जुलैतील सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवसाचे अधिक तापमान म्हणून अधिक आर्द्रता असेल. त्यामुळेच जुलै महिन्यात पावसाची शक्यता सरासरीपेक्षा अधिक जाणवणार आहे.

किमान तापमान

संपूर्ण महाराष्ट्रात जुलै महिन्यात पहाटे पाच वाजताचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता अधिक आहे. जुलै महिना पावसाळी असेल आणि आकाश नेहमी अभ्राच्छादित स्थितीतून किमान तापमानात वाढ जाणवणार आहे.

ला निना

सध्या एन्सो जुलै महिन्यात तटस्थ असून ऑगस्ट महिन्यात ‘ला-निना’ दिसणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थेतील एन्सो स्थिती पूरक असेल.

आयओडी

आतापर्यंत आयओडी धन होता. परंतु पुन्हा तटस्थेकडे झुकत असल्यामुळे जुलैमधील पावसासाठी जमेची बाजू समजावी.

एमजेओ (मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन)

अरबी समुद्रात मार्गक्रमणातील ‘एमजेओ’चे मार्गक्रमण २७ जूनपासून महाराष्ट्रात मध्यम पाऊस देत आहे. सध्या हे मार्गक्रमण बंगालच्या उपसागरात आहे. विशेषतः बंगाल उपसागरीय मॉन्सून शाखेला बळ देत आहे.

‘एमजेओ’मुळे १० जुलैपर्यंत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यात अति जोरदार ते अतिवृष्टी सदृश पावसाची शक्यता वाढली आहे. महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या दहा दिवसांत मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

जुलै महिन्याच्या पूर्वार्धातील पावसाची स्थिती

मराठवाडा वगळता राज्यात पुढील आठ दिवसांत म्हणजे १० जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

गेल्या १० दिवसांपासून होत असलेल्या पावसाचा जोर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि उत्तर नाशिक जिल्ह्यांत अजूनही कायम आहे.

मराठवाड्यात दरम्यानच्या काळात मात्र जालना, हिंगोली जिल्ह्यांत मध्यम आणि छत्रपती संभाजीनगर, बीड नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

माणिकराव खुळे, ९४२२०५९०६२

(सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान विभाग, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT